Showing posts with label Tushar Kute. Show all posts
Showing posts with label Tushar Kute. Show all posts

Sunday, May 30, 2010

सांगा आमच्या माणसांना




कवितव्य की कवित्व हे
सांगा आमच्या माणसांना
दिव्यत्वाची येथ प्रचिती
दाखवा आमच्या माणसांना...

विषतव्य की विश्वत्व हे
समजवा आमच्या माणसांना
विश्वरूपी कुटुंबाची प्रतिमा
दाखवा आमच्या माणसांना...

साधुतव्य की साधुत्व हे
पटवा आमच्या माणसांना
स्वत्व सोडण्याचा दृष्टांत
द्यावा आमच्या माणसांना...

अमरतव्य की अमरत्व हे
बघू द्या आमच्या माणसांना
एकलकोंडा तो अश्वस्थामा तो
दाखवा आमच्या माणसांना...

सतव्य की स्वत्व हे
पाहू द्या आमच्या माणसांना
मी-मी करूनी काय होते ते
समजू द्या आमच्या माणसांना...

भारतीसत्व की भारतीयत्व ते
सांगा आमच्या माणसांना
गांधीजींच्या यी देशाचा नागरिक
दाखवा आमच्या माणसांना...

पुन्हा एकदा


हृदयावरची शकले आता

माझी सारी गळू लागली

मनातली ती आर्त स्पंदने

पुन्हा तिला ही कळू लागली


जीव असा हा आसुसलेला

भावना तिला ही कळू लागली

माझ्या मनीचे बोल अंतरी

साठवून ती हसू लागली


बंध प्रेमाचे आठवून ती

मनात पुन्हा लाजू लागली

मनातली ती आर्त स्पंदने

पुन्हा तिला ही कळू लागली


परत नव्या या जगात माझ्या

भाव ती अंतरी उमजू लागली

मायेच्या त्या विश्वात माझ्या

हर्ष नवा ती जगू लागली


एकच चिंतन माझ्या हृदयी

आता पुन्हा ती साठवू लागली

मनातली ती आर्त स्पंदने

पुन्हा तिला ही कळू लागली